Monday, 17 December 2012

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर दु:खातही...

आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"
त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं

त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे . . .

अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं........


गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं........

मनसोक्त जगून घ्यावं...



नाजुकशा कळीचं ते मोहक हास्य,
फुलणाऱ्या फुलाचं ते अबोल भाष्य,
डोळ्यात सारं साठवून मिटून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

काळोखाच्या शालीवर तारकांची कोरीव नक्षी,
अनंत आकाशी भरारी घेती छोटे छोटे पक्षी,
छोट्याशा मनातील स्वप्नांना मग आशेचं बळ द्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

वाट बघणारा श्रीकॄष्ण घाली राधिकेला सुमधूर साद,
बासरीच्या सुराकडे खेचला जाई तिच्या पैंजणांचा नाद,
हळूवार या नादावर कधी आपलंही मन थिरकावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

सरला जरी ऋतू, जरी नसला कधी बहर,
येतील दिवस चैतन्याचे,घेऊन नव्या पालवीचा मोहर,
निसर्गाचं हे गुपित जरा आपणही जाणून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं.......

मैत्री म्हणजे ........


मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग