Tuesday, 24 December 2013

कणा

ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?

कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून

गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले

प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे

खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला

मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा

पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !

- कवी कुसुमाग्र

Sunday, 20 October 2013

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते...
कोण ग तो तुझा
म्हटल्यावर झुकलेली नजर
आणि गुलाबी झालेले गाल
बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

रोज निरोप घेताना

पुन्हा कधी भेटशील
म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

कारण नसताना तासभर

फोनवर
भांडायच स्वतः राग
करून फोनही ठेवायच.
फोन ठेवल्यानंतर
मिनिटात आलेला
आय लव यु चा मँसेज बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

नकळत स्पर्श झाल्यावर

तिच्या हृदयाचा चुकणारा
ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटत....

Monday, 7 January 2013

अडगळीच्या खोलीमधलं....

दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||


प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

 तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकt तुला खात्री...

Saturday, 5 January 2013

आपल्या माणसांसठी जीव आपोआप तळमळतो

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो |
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो |
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो |
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो |
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे |
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे |

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो |
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो |
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली |
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली |
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे |
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे |

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो |
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो |
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो |
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो |
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे |
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे |

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो |
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो |
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला |
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला |
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे |
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे |

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा |
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा |
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो |
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो |
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे |
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे |

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो |
मायेच्या आपल्या माणसांसाkठी जीव आपोआप तळमळतो |

Monday, 17 December 2012

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर दु:खातही...

आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"
त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं

त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे . . .

अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं........


गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं........